Home कोल्हापूर Accident | कार कंटेनरचा अपघात, एकाच कुटुंबातील ४ जण ठार

Accident | कार कंटेनरचा अपघात, एकाच कुटुंबातील ४ जण ठार

Kolhapur Car container accident kills 4 members of family

Kolhapur | कोल्हापूर: पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात हॉटेल अमरसमोर एका धोकादायक वळणावर कंटेनर आणि कारच्या झालेल्या भीषण धडकेत (Accident )कारमधील चार जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी घडला. विशेष म्हणजे या अपघातात लग्नासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील वऱ्हाडी मंडळीतील नवरीच्या भावासह चुलते, चुलती व आजी ठार झाली.

छाया आदगोंडा पाटील वय ५५,  आदगोंडा बाबू पाटील, महेश देवगौडा पाटील वय २३ आणि चंपाताई मगदूम वय ८० सर्व रा. बोरगाववाडी ता. निपाणी अशी मृतांची नावे आहेत.

स्तवनिधी येथील मंगल कार्यालयात मुलीचे लग्न होते. यासाठी सर्व जण जात होते. लग्न स्थळापासून केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वळणावर कंटेनरने कारला धडक दिल्याने चार जण जागीच ठार झाले.  

Web Title: Kolhapur Car container accident kills 4 members of family

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here