प्रेमात शरीरसंबंध ठेवले, पण या धक्कादायक कारणावरुन लग्नाला दिला नकार
Aurangabad | औरंगाबाद: प्रेमात वाहून जात दोघांनी शारीरिक संबंध (Sex) प्रस्थापित केले पण या प्रेमाचे रुपांतर नात्यात करावं. त्यासाठी तिने त्याला लग्नाची मागणी केली असता तिथेच सारं खटकलं. जात जाता जात नाही हेही एक कटू सत्य आहे. औरंगाबाद मध्ये असाच प्रकार समोर आला आहे. एका प्रियकरानं त्याच्या प्रेयसीला जात जुळत नाही म्हणून लग्नाला नकार दिला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात ही घटना घडली आहे. लग्न होण्याअगोदरच शारीरिक संबंध ठेवले आणि लग्नाच्या वेळी जात जुळत नसल्याचं कारण देत लग्न करण्यास एका तरुणाने त्याच्या प्रेयसील नकार दिला आहे.
अविनाश असं त्या तरुणाचं नाव आहे. तो अहमदनगर जिल्ह्यातील गणोरे इथला असून सध्या पैठणमध्ये राहतो.
याबाबत माहिती अशी की, स्पर्धा परिक्षेची तयारी करताना या दोघांची मुंबईत भेट झाली. या भेटीतून त्यांची मैत्री झाली. या भेटी गाठीतून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध (Sex)प्रस्थापित झाले, दोघांनीही अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. आता या संबंधांचं पवित्र नात्यात रुपांतर व्हाव म्हणून तरुणीने तिच्या प्रियकराकडे लग्नाची मागणी केली. मात्र प्रेयसीने लग्नाची मागणी करताच आपल्या दोघांची जात वेगळी आहे असं म्हणत आपली जात जुळत नाही असं कारण त्याने पुढे केलं आणि लग्नाला साफ नकार देत हा तरुण मोकळा झाला.
नकार मिळाल्याने त्या तरुणीच्या पायाखालची जमीनच सरकरली. ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याला सर्वस्व अर्पण केलं त्याने केवळ जातीचं कारण सांगत नकार दिल्याने ती तरुणी खचली होती. तरीही तिने अनेक दिवस त्याच्या होकाराची वाट पाहत होती. मात्र एवढं करुनही त्याच्याकडून काहीच उत्तर मिळत नसल्याने तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात बलात्कारासह (rape) अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: love kept sex, but for this reason refused to marry