Home संगमनेर संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर बसने घेतला अचानक पेट- Fire

संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर बसने घेतला अचानक पेट- Fire

Ahmednagar Pune-Nashik National Highway, a Tempo Traveler bus suddenly caught fire

Ahmednagar |Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात टेम्पो ट्रॅव्हलर बसणे अचानक पेट (Fire) घेतल्याची धक्कादायक घटना शनिवार दिनांक 28 मे रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी वरुन संगमनेर मार्गे भीमाशंकरला १० प्रवासी घेऊन चाललेली बस (क्रमांक एम एच १२ के आर ०४३४) ही शनिवारी सकाळी चंदनापुरी घाटात आली असता अचानक गरम झाली चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेतली व प्रवाश्यांना बस मधून खाली उतरण्याची सुचना केली. त्याच दरम्यान बसने अचानक पेट घेतला व काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. केवळ दैव बलवत्तर असल्याने तसेच चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

या घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, नारायण ढोकरे,पं ढरीनाथ पुजारी यांसह हायवे प्रशासन घटनास्थळी पोहोचले व अग्नीशमन दलाला पाचारण करुन ही आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. ह्या घटनेमुळे वाहणांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज विजय काकडे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Ahmednagar Pune-Nashik National Highway, a Tempo Traveler bus suddenly caught fire

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here