Home अहमदनगर अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड: १४ व्या रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर जिल्हा रुग्णालय अग्निकांड: १४ व्या रुग्णांचा मृत्यू

Ahmednagar District Hospital fire 14th patient dies

अहमदनगर | Ahmednagar : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागून आत्तापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यु झाला होता. त्यात या आगीत जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा सोमवारी दुपारी उपचार सुरु असताना मृत्यू  झाला.

रंभाबाई अंजाराम विधाते (वय 80 रा. बाभूळखेडा ता. नेवासा) असे या रूग्णाचे नाव आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबरला आग लागली होती. त्यावेळी विभागात करोनाचे 17 रूग्ण उपचार घेत होते. आगीच्या घटनेच्या दिवशी 11 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनेतील इतर रूग्णांना खासगी रूग्णालयात  हलविण्यात आले. त्यात एका खासगी रूग्णालयात  दाखल असलेल्या चौघांपैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. त्या तिघांपैकी सोमवारी दुपारी रंभाबाई यांचा मृत्यू झाला. जिल्हा रूग्णालयातील आगीच्या घटनेत मृतांची संख्या आता 14 झाली आहे.

Web Title: Ahmednagar District Hospital fire 14th patient dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here