Home अहमदनगर प्रेमसंबंध ठेऊन तरुणीवर अत्याचार, तरुणाने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू

प्रेमसंबंध ठेऊन तरुणीवर अत्याचार, तरुणाने गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तिचा मृत्यू

Rape Case Atrocities on a young woman by having a love affair

अहमदनगर | Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याने तिची गर्भधारणा झाली. त्यामुळे तिचा गर्भपात व्हावा याकरिता तिला डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय गोळ्या देण्यात आल्याने तिचा मृत्यू झाल्याची  नगर शहरात घडली. याप्रकरणी सईद ताहेर बेग (वय 33 रा. काटवन खंडोबा) याच्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात अत्याचार, अ‍ॅट्रोसिटी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. वडीलासह नगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या 21 वर्षीय तरूणीला सईद बेग याने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेऊन तिच्या इच्छे विरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्या तरूणीने सईदकडे लग्न करण्याबद्दल विचारणा केली असता त्याने तिला उडवाउडवीचे उत्तर दिले. सईद याचे या पुर्वी दोन लग्न झाले होते. असे असताना त्याने अविवाहित असल्याचे सांगितले अन गोड बोलून तिच्याशी तिच्या इच्छेविरूद्ध अत्याचार केला. त्यातुन ती तरूणी गर्भवती झाली.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

तिला वेळोवेळी मारहाण, शिवीगाळ व शारीरिक छळ केला. तिचा गर्भपात व्हावा म्हणून गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. यातून तरूणीला त्रास होऊ लागल्याने तिला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके करीत आहे.

Web Title: Rape Case Atrocities on a young woman by having a love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here