Home Accident News दुर्दैवी घटना: तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

दुर्दैवी घटना: तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

Rahuri accident Young man falls into a well and dies

राहुरी | Accident: एका २४ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील कणगर शिवारात सोमवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.

भारत बाबासाहेब वरघुडे असे मयत  तरूणांचे नाव आहे. सोमवारी सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास भारत वरघुडे विहिरीत पडला असताना त्यांच्या वडीलांनी पाहिले व आरडाओरडा सुरु केला.

यावेळी गावचे सरपंच सर्जेराव घाडगे व पोलिस पाटील बाळासाहेब मुसमाडे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणावर ही माहीती दिली. तसेच सोशलमिडियावर मदतीसाठी आवाहन केले.

सुभाष वराळे, अनिल बर्डे अन्य दोघे स्थानिक पोहणारे भारत यास विहिरीत शोधण्याचा प्रयत्न केला. राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आपत्कालीन व्यवस्थापन पथक मदतीसाठी पाठविले. मात्र तीन तासानंतर भारत गळाला लागला मात्र त्यांच्या पोटात पाणी गेल्याने तो मयत झाला होता. राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात आले. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद राहुरी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Rahuri accident Young man falls into a well and dies

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here