Home अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग: मृतांच्या पोस्टमार्टम अहवालातून महत्त्वाची माहिती आली समोर

जिल्हा रुग्णालय आग: मृतांच्या पोस्टमार्टम अहवालातून महत्त्वाची माहिती आली समोर

Ahmednagar Important information came from the postmortem report

अहमदनगर | Ahmednagar:  जिल्हा सरकारी रुग्णालयातील कोरोना अतिदक्षता विभागात आग लागून ११ जणांचा मृत्यू झाला असून या  रुग्णांचा पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे. त्यानुसार मयत ११ पैकी सहा जणांचा मृत्यू गुदमरून तर तिघांचा होरपळून, एकाचा ६० टक्के भाजल्यामुळे मृत्यू झाला आहे. तसेच एका रुग्णाचे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे,

शनिवारी जिल्हा रुग्णालयात अति दक्षता विभागात आग ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे जाणून घेण्यासाठी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. आग प्रकरणाची चौकशी आणि पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी तो महत्वाचा ठरणार आहे. त्याचा प्राथमिक अहवाल हाती आला आहे. त्यानुसार सहा रुग्णांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे आढळून आले. इतर तिघे आगीत होरपळले असल्याचं दिसून आलं. एक रुग्ण ६० टक्के भाजलेला त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. एकाच्या मूत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Ahmednagar Important information came from the postmortem report

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here