आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद करण्याचे संकेत: मंत्री हसन मुश्रीफ
अहमदनगर | Ahmednagar: लोकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे लॉकडाऊन लागू करूनही काहीही फलित झालेले नाही. सकाळी सात ते अकरा या वेळेत लोक जत्रेसारखे फिरतात त्यामुळे आरोग्य सेवा वगळता इतर सर्व सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
त्यामुळे पुढील १४ दिवस कडक लॉकडाऊन करावे लागणार आहे. तशा सूचना प्रशासनाला देण्यात येणार आहे असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
शुक्रवारी मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी श्रीरामपूर येथे आढावा बैठक घेतली. नगरमध्ये ऑक्सिजन प्लांटला भेट दिली. जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतला.
कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर आपण गाफिल राहिलो, बेजबाबदारपणे वागल्यामुळे दुसरी लाट घातक ठरली आहे. ही साखळी तोडण्यासाठी स्थानिक पातळीवर कडक लॉकडाऊन पाळणे गरजेचे आहे.
नगर, संगमनेर, श्रीरामपूर येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. शिर्डी येथे दोन हजार बेडसचे जम्बो कोविड रुग्णालय सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरला उपचारासाठी येणारी गर्दी कमी होईल.
Web Title: Ahmednagar Indications for closure of all services