संगमनेर: चिंचोली गुरव येथे दुर्दैवी घटना, आजी नातीचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील जाधव वस्तीजवळ शेळ्या व गुरे चारण्यासाठी गेलेल्या आजी नातीचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
भक्ती एकनाथ आभाळे वय ७ व प्रमिला श्रीराम आभाळे वय ४५ असे मृत्यू झालेली आजी नातीचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी तीन वाजेच्या सुमारास आजी व नात शेळ्या व गुरे चारण्यासाठी जाधव वस्ती येथे गेल्या होत्या. यावेळी भक्ती बंधाऱ्याजवळ गेली असता तिचा पाय घसरून बंधाऱ्यात पडली तेव्हा तिला वाचाविण्यासाठी गेलेल्या आजीचा देखील बुडून मृत्यू झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुलीचे वडील एकनाथ श्रीराम आभाळे हे जाधव वस्ती गेले असता त्याना आजी नाती बंधाऱ्यात बुडाल्याचे लक्षात आले. नंतर त्यांना बंधाऱ्यातून बाहेर काढून तळेगाव दिघे येथील रुगणालयात नंतर संगमनेर तालूक्यातील घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात शावविचेदन करण्यासाठी नेण्यात आले. रात्री आठ वाजेच्या सुमारास या दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल जाधव हे घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Sangamner Grandmother and grandson drowned in the dam