Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कडक निर्बध उद्यापासून लागू

अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कडक निर्बध उद्यापासून लागू

Ahmednagar Another strict curfew

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनाकामी जिल्ह्यामध्ये २ मे २०२१ ते १५ मे २०२१ या कालवधीत दुचाकीवर एकापेक्षा अधिक व्यक्तीस प्रवासास मनाई करण्यात आली आहे.

सध्या सूट असलेल्या बाबींकरिता मोठ्या प्रमाणावर दुचाकीवर दोन व्यक्ती फिरत असल्याची निदर्शनास येत आहे तथापि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोकण्यासाठी दुचाकीवर एक पेक्षा अधिक व्यक्तींना प्रवासास मनाई करण्यात आली आहे. पण वैद्यकीय कारण असेल तर त्यास परवानगी देण्यात आली आहे.  कोणीही या नियमाचे उल्लंघन केल्यास तो दंडात्मक कारवाईस पात्र राहील असा जिल्हाधिकारी डॉ, राजेंद्र भोसले यांनी आदेश काढला आहे. याची कार्यवाही उद्या २ मे पासून होणार आहे. तसेच अगोदर केलेली नियमावलीचे देखील काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.  

Web Title: Ahmednagar Another strict curfew

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here