Home अहमदनगर बनावट धनादेशप्रकरणी मुख्य सूत्रधारास दिल्ली येथून अटक

बनावट धनादेशप्रकरणी मुख्य सूत्रधारास दिल्ली येथून अटक

Ahmednagar mastermind arrested in fake check case from Delhi

अहमदनगर | Ahmednagar: बनावट धनादेशाद्वारे वेगवेगळ्या बँकांमधून कोट्यावधी रुपये काढण्याचे प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार आरोपीस दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

विजेंद्र रघुनंदनसिंग दक्ष वय ३९ रा. कालकाजी दक्षिण दिल्ली असे या मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. याअगोदर स्थानिक गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केलीली आहे.

याबाबत माहिती अशी की, दिल्ली येथील आरोपी दक्ष यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. यानंतर आरोपी दक्ष यास महानगर दंडाधिकारी साकेत न्यायालय परिसर नवी दिल्ली यांच्या न्यायालायात हजर केले. आरोपीस दोन दिवसांची रिमांड घेऊन त्याला अहमदनगर येथे आणून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीला ७ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या आरोपीने विविध बँकमध्ये बनावट धनादेशाद्वारे कोट्यावधी रुपयांचा अपहार केला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून महाराष्ट्र व इतर राज्यातील गुन्हे बाहेर येण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar mastermind arrested in fake check case from Delhi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here