अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या झाली कमी पण मृत्यूचे थैमान, तीन दिवसांत तब्बल
अहमदनगर | Ahmednagar News: अहमदनगर जिल्हायात सध्या कोरोनाची संख्या कमी होत असताना दिसत असली मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सोमवारी ४५, मंगळवारी ५४ तर बुधवारी ६३ रुग्ण दगावले आहे.
जिल्ह्यातील एकूण मृत्यूची आकडेवारी ३ हजार ३३६ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात रुग्णावाढ कमी झाली असली तरी मृत्यूने थैमान घातले आहे. मृतांच्या आकडेवारीत घट होताना दिसून येत नाही. गेल्या ३ दिवसांत तब्बल १६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण अंगावर शहारे आणणारे आहे. त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान जिल्ह्यात आज १८०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर रुग्णसंखेत ८५८ ने वाढ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ९ हजार ८ रुग्णांवर उपचार सुरु आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २,६४,१४५ इतकी झाली आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या २,५१,८०१ इतकी झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Corona Death 3336