Home अहमदनगर मुलांना नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक

मुलांना नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून सहा लाखांची फसवणूक

Ahmednagar News Fraud of Rs 6 lakh by showing the lure of giving jobs

अहमदनगर | Ahmednagar News: पारनेर तालुक्यातील सुपा येथील शेतकऱ्यास दोन्ही मुलांना रेल्वेत नोकरीस लावून देतो असे आमिष दाखवून ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अमोल नारायण सोनवणे याने दिलेल्या फिर्यादीवरून सुखदेव मारुती गवळी रा. आपधूप ता. पारनेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गवळी याने अमोल यांचे वडील नारायण यांना सांगितले की, माझे रेल्वेतील अधिकारी ओळखीचे आहेत. तुमच्या दोन्ही मुलांना रेल्वे खात्यात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून १० लाख रुपये घेतले.

पैसे देवूनही नोकरी मिळाली नाही. गवळी यांच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा त्याने चार लाख रुपये परत केले मात्र उर्वरित सहा लाख रुपये मागितले तेव्हा आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत म्हंटले आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक पवार हे करीत आहे.

Web Title: Ahmednagar News Fraud of Rs 6 lakh by showing the lure of giving jobs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here