Home अहमदनगर महिलेच्या भावास चाकू मारून बहिणीचा विनयभंग

महिलेच्या भावास चाकू मारून बहिणीचा विनयभंग

Crime News Sister molested by stabbing woman's brother

अहमदनगर | Crime News: तरुणास चाकू मारून त्याच्या बहिणीचा विनयभंग व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून दस्तगिर बडेसाब सय्यद, निसार बडेसाब सय्यद, अब्राल अल्ताभ हाजी, निहाल दस्तगीर सय्यद सर्व रा, नगर यांच्यासह एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिला गवत आणण्यासाठी गेली तेव्हा तेथे तिच्याशी आरोपींनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी महिलेची बहिण व भाऊ भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी आरोपींनी महिलेच्या भावास चाकू मारला तसेच बहिणीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक तरटे हे पुढील तपास करीत आहे.  

Web Title: Crime News Sister molested by stabbing woman’s brother

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here