युवकाचे अपहरण, खंडणी व जीवे मारण्याच्या प्रयत्नातून तिघांवर गुन्हा दाखल
पारनेर | Ahmednagar News: पारनेर तालुक्यातील पिप्री जलसेन येथील आकाश बबन काळे या युवकाचे अपहरण करून ५० हजार रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी व लोखंडी गजाने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर येथील सचिन बाबाजी बोरुडे, अशोक बोरुडे, संग्राम कावरे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गेल्या आठवड्यात पिंप्री जलसेन येथील एका युवकाचा चिचोली येथे पठारवाडीच्या एका व्यक्तीस मोटारसायकलचा धक्का बसला होता. सदर प्रकरण मिटविण्यासाठी आकाश काळे सोबत आला होता. याचाच राग मनात धरून आकाश काळे या युवकाचे इनोव्हा गाडीतून अपहरण करण्यात आले. त्यास काठी व लोखंडी गजाने मारहाण करण्यात आली त्याचा हात मोडला. त्याच्याकडून ५० हजाराची खंडणी मागण्यात आली
घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी घटनास्थळी भेट देऊन आकाश काळे यास रुग्णालयात दाखल केले.
आकाश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर येथील सचिन बाबाजी बोरुडे, आकाश बोरुडे व संग्राम कावरे यांच्याविरुद्ध अपहरण करून खंडणी मागणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आदी कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे करत आहेत.
Web Title: Ahmednagar News Youth kidnapping ransom