Home अहमदनगर अहमदनगर: खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग

अहमदनगर: खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सचा विनयभंग

Ahmednagar News:  खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणार्‍या महिलेचा पाठलाग करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्‍या तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा (Molested) गुन्हा दाखल.

Ahmednagar nurse working in a private hospital was molested

अहमदनगर:  खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करणार्‍या महिलेचा पाठलाग करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करणार्‍या तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ही घटना घडली.

याबाबत पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. जनार्धन वाघमोडे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करतात. त्या ड्यूटीला जात असताना जनार्धन त्यांचा पाठलाग करत होता. ही घटना जुलै 2022 मध्ये घडली होती. त्यावेळी फिर्यादीने त्याला समजून सांगून झाला प्रकार तेथेच सोडून दिला होता. त्यांनी तक्रार दिली नव्हती.

दरम्यान शनिवारी दिनांक 1 एप्रिल रोजी सकाळी साडे नऊ वाजता फिर्यादी हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर जात असताना जनार्धनने त्यांचा पाठलाग केला व त्यांना रस्त्यावर गाठून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली असता तो तेथून पळून गेला. त्यानंतर फिर्यादी ड्यूटीवर गेल्या. त्यांनी तेथून जनार्धनच्या वडिलांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. वडिलांना सांगितल्याचा राग मनात धरून त्याने फिर्यादीला फोनवर शिवीगाळ केली. फिर्यादी सायंकाळी ड्यूटीवरून परतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar nurse working in a private hospital was molested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here