Home अहमदनगर अहमदनगर: वीजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी  

अहमदनगर: वीजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी  

Ahmednagar News:  केडगाव येथे वीजेचा शॉक (Electric Shock) बसून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी  झाल्याची घटना.

One person died and one person was injured due to electric shock

अहमदनगर: केडगाव येथे वीजेचा शॉक बसून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी  झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अक्षय शांतवन ऊर्फ पोपट पाटोळे (वय 30, रा. डोंगरगण ता. नगर) असे मयताचे नाव आहे. तर सोमनाथ दामू भांबळ (वय 40 रा. डोंगरगण) हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आरूण शांतवन ऊर्फ पोपट पाटोळे (वय 35 रा. चांदा ता. नेवासा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ठेकेदार अमित आजिनाथ थोरात (रा. माळीवाडा) व विद्युत महामंडळाचे अधिकारी, वायरमन यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय पाटोळे व सोमनाथ भांबळ हे वीजेचे काम करणारा ठेकेदार अमित थोरात याच्याकडे कामाला होते. ते शनिवारी केडगाव  उपनगरात चौधरी मळा येथे काम करत असताना त्यांना अचानक वीजेचा शॉक बसला. यामध्ये जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच अक्षयला मृत घोषित करण्यात आले. सोमनाथवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान ठेकेदार थोरात, विद्युत महामंडळाचे अधिकारी व वायरमन यांचे हायगयने, हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे भाऊ अक्षयचा मृत्यू होवून त्याचा मित्र सोमनाथ जखमी झाला असल्याचे आरूण पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: One person died and one person was injured due to an electric shock

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here