Home क्राईम बाबा, माझं लग्न करून द्या, म्हणत केला बापाचा खून

बाबा, माझं लग्न करून द्या, म्हणत केला बापाचा खून

Murder Case: ‘बाबा माझं लग्न करून द्या…’, असे म्हणत झालेल्या वादात मुलाने बांबूच्या काठीने वृद्ध बापाच्या डोक्यावर वार केल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना.

Dad, let me marry, Murder his father

बुलढाणा : ‘बाबा माझं लग्न करून द्या…’, असे म्हणत झालेल्या वादात मुलाने बांबूच्या काठीने वृद्ध बापाच्या डोक्यावर वार केल्याने वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळगाव काळे शेतशिवारात शनिवारी सकाळी उघडकीस आली.

नानसिंग पहाडसिंग भैड्या (६०) असे मृत वडिलांचे नाव आहे. ते वीटभट्टीवर मजूर म्हणून कामाला होते. त्यांचा मुलगा भावसिंग नानसिंग भैड्या (४०) हा आठ दिवसांपासून त्यांच्यासोबत काम करीत होता. शुक्रवारी बाप- लेक बाजाराला गेले. संध्याकाळी दारू पिऊन वीटभट्टीवर परत आले. रात्री आरोपी मुलगा भावसिंग याने लग्न करून द्या, असा तगादा लावत वडील नानसिंग यांच्याशी वाद घातला. भावसिंग याने नानसिंग यांना बांबूच्या काठीने मारहाण केली. काठीचा डोक्यात मार लागून नानसिंग यांचा मृत्यू झाला. आरोपी भावसिंगची चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला. त्याला अटक करण्यात आली आहे..

Web Title: Dad, let me marry, Murder his father

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here