Home क्राईम हनी ट्रॅप, व्यावसायिकांना बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी, खंडणीप्रकरणात वकीलच अडकला जाळ्यात

हनी ट्रॅप, व्यावसायिकांना बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी, खंडणीप्रकरणात वकीलच अडकला जाळ्यात

Pune Crime: कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून आळीपाळीने तिच्याशी शारीरिक संबंध केला. त्याचे व्हिडीओ चित्रण केले. ते फिर्यादीला दाखवून तिला दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे चित्रण करून त्या व्यावसायिकाला लुबाडले. (Honey trap).

Honey trap, threatening businessmen to make false rape case

पुणे: एका महिलेच्या मदतीने अनेक व्यावसायिकांना बलात्काराची खोटी केस करण्याची धमकी देऊन लुबाडले, त्या वकिलाविरोधात आता बलात्काराची तक्रार दाखल झाली आहे. दुसऱ्यांबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायला लावून त्याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अॅड. विक्रम भाटे (वय ३४, रा. हडपसर) आणि वैभव शिंदे (वय ३४) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकांना अडकवून त्यांच्यावर बलात्काराची केस करण्याची धमकी देऊन अॅड. विक्रम भाटे याने १७ लाखांना लुबाडले होते. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या व्यावसायिकाच्या मैत्रिणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वाघोलीत जून २०२१ ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान घडला.

वैभव शिंदे, अॅड. विक्रम भाटे यांनी कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळून आळीपाळीने तिच्याशी शारीरिक संबंध केला. त्याचे व्हिडीओ चित्रण केले. ते फिर्यादीला दाखवून तिला दुसऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचे चित्रण करून त्या व्यावसायिकाला लुबाडले. दुसऱ्या एकाला तिच्या मैत्रिणीच्या मदतीने १७ लाखाला लुटले. तो पिडीतेचा मित्र होता. त्यानंतर या व्यावसायिकाने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भाटे याला अटक केली.

Web Title: Honey trap, threatening businessmen to make false rape case

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here