Home क्राईम धक्कादायक! न्यायालयात दंडाधिकाऱ्यावर चप्पल भिरकावली

धक्कादायक! न्यायालयात दंडाधिकाऱ्यावर चप्पल भिरकावली

Crime News: मनासारखा निकाल लवकरात लवकर लागत नसल्याच्या रागात दंडाधिकाऱ्यावर चप्पल भिरकावल्याची घटना.

Slippers were thrown on the magistrate in the court crime Filed

मुंबई : मनासारखा निकाल लवकरात लवकर लागत नसल्याच्या रागात दंडाधिकाऱ्यावर चप्पल भिरकावल्याची घटना कुर्ला न्यायालयात घडली. या घटनेने न्यायालयात खळबळ उडाली. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी जावेद सुभाष शेख ऊर्फ प्रदीप सुभाष तायडे (४०) याला अटक केली आहे.

शनिवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास कुर्ला येथील महानगर दंडाधिकारी ६० वे न्यायालयात ही घटना घडली. तायडे हा मानखुर्दचा रहिवासी आहे. आरोपीने न्यायालयाचे कामकाज चालू असताना त्याच्या विरुद्ध प्रलंबित असलेल्या खटल्याचा लवकरात लवकर त्याच्याप्रमाणे निकाल लावून त्याला कोर्टाच्या फेऱ्यातून मुक्त करावे, अशी वारंवार मागणी करत आरडाओरडा केला. तसेच महानगर दंडाधिकारी अ. अ. धुमकेकर यांच्यावर चप्पल फेकून मारली. न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणून न्यायालयाचा अवमान केला म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. याप्रकरणात त्याने ५ वर्षे शिक्षाही भोगली आहे, तर ट्रॉमबे पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद आहे.

Web Title: Slippers were thrown on the magistrate in the court crime Filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here