Home क्राईम संगमनेर: आत्महत्येस प्रवृत्त केल्याने महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर: आत्महत्येस प्रवृत्त केल्याने महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Sangamner Crime:  मनोरुग्णाचा झटका आल्याने दिवस-रात्र अन्नपाणी न देता त्याला दोरीने बांधून ठेवल्याने त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या (Suicide) करणाऱ्या मनोरुग्णाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या महिलेवर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Crime has been registered against the woman for abetting suicide

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मनोरुग्णाचा झटका आल्याने दिवस-रात्र अन्नपाणी न देता त्याला दोरीने बांधून ठेवल्याने त्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करणाऱ्या मनोरुग्णाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या महिलेवर संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सारंगधर गंगाधर पावसे (वय ६०) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नीने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून माधुरी प्रभाकर गोडसे (रा. लहीत लिंगदेव, ता. अकोले, हल्ली मु. आठरके वस्ती, हिवरगाव पावसा) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी माहेरी गेल्यानंतर तिचा पती सारंगधर गंगाधर पावसे यांना दि. २९ मार्चला सकाळी अकरा ते साडेअकराच्या दरम्यान सातव, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोरुग्णपणाचा झटका आला. त्यामुळे ते घरातील लोकांना त्रास देऊ लागल्याने आरोपी महिला माधुरी गोडसे हिने रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या मदतीने सारंगधर पावसे यांचे हातपाय दोरीने बांधून घरासमोरील पडवीत सिमेंटच्या पोलला त्यांना बांधून ठेवले होते. दि. ३० मार्चला सकाळी साडेनऊच्या सुमारास सारंगधर पावसे यांची हालचाल मंदावल्याने त्यांचे हातपाय सोडण्यात आले. मात्र जेवण न दिल्याने भुकेल्या पावसे यांनी घरातील मिळेल ते पिऊन घेतले. आरोपीने फिर्यादीच्या पतीस २९ ते ३० मार्चदरम्यान जेवण न देता हातपाय बांधून छळ करीत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने त्यांनी काहीतरी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली, अशी फिर्याद दिल्याने तालुका पोलिसांनी चौकशीवरून आरोपीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा रविवार (दि. २) दाखल करण्यात आला आहे.  पोलिस उपाधीक्षक संजय देवीदास ढुमणे, पोलिस उपनिरीक्षक आय. ए. शेख आदींनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Crime has been registered against the woman for abetting suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here