राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित
Ahmednagar News Live | Rahuri | राहुरी: राहुरी कारागृहातून मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी पसार झाल्याप्रकरणी उपनिरीक्षक व पाच कर्मचारी यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यापाठोपाठ राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक इंगळे यांना निलंबित करण्यात आले आहे. नाशिक परिक्षेत्राचे उपमहारीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी ही कारवाई केली आहे.
राहुरी येथील कारागृहात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपींनी खिडकीचे गज कापून पलायन केल्याची घटना १८ डिसेंबर २०२१ रोजी घडली होती. यामुळे पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, पोलिसांवर टीका होत होत्या. उपनिरीक्षकांकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक डॉ. काळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.
त्यांनी चौकशी करून अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना सादर केला होता. मनोज पाटील यांनी इंगळे यांच्या कारवाईचा प्रस्ताव उपमहानिरीक्षकांना पाठविला होता. त्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार शेखर पाटील यांनी इंगळे यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे.
Web Title: Ahmednagar Police inspector of Rahuri police station suspended