अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस शिक्षा
Ahmednagar | अहमदनगर: अल्पवयीन मुलीची विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांनी ५ वर्षे सक्तमजुरी व सहा हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
संतोष दिगंबर भालेकर (वय 44 रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 22 जून 2021 रोजी सकाळी फिर्यादी तिच्या पती समवेत कामानिमित्त घराबाहेर गेले असताना त्यांची अल्पवयीन मुलगी ही घरात एकटीच होती. त्यावेळी संतोष भालेकर याने फिर्यादी यांच्या लहान मुलीस खांद्यावर बसवुन तिच्या घरी सोडविण्यासाठी जात असताना आरोपीने पिडीत मुलीचा विनयभंग केला होता (molesting a minor girl). तसेच तिची छेडछाड केली. याप्रकरणी आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम विनयभंगसह पोक्सोप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्हयाचा तपास पो.उप निरीक्षक दिपक पाठक यांनी करून न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याची सुनावणी अतिरीक्त जिल्हा न्यायाधीश श्रीमती बरालिया यांच्यासमोर झाली. खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले. खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकुण 6 साक्षीदार तपासण्यात आले.
पिडीत मुलगी, पिडीत मुलीची आई, पंच, साक्षीदार, तपासी अंमलदार, तसेच वयासंदर्भात जन्म-मृत्यु अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली. सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी पोहेकॉ कृष्णा नंदु पारखे यांनी अतिरीक्त सरकारी वकील कुलकर्णी यांना मदत केली.
Web Title: Ahmednagar Punishment for accused of molesting a minor girl