Home अहमदनगर राहुरी: डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने खळबळ

राहुरी: डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Rahuri Accident finding the doctor's body

राहुरी | Rahuri Accident: राहुरी तालुक्यातील उंबरे येथील डॉ. सतीश लक्ष्मण दुशिंग (वय 44) यांचा राहुरी तालुक्यातील सडे येथे रेल्वे भुयारीमार्गालगत मृतदेह आढळून आल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

डॉ. दुशिंग हे उंबरे येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करत होते. रविवारी रात्रीच्या वेळी ते आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालकासाठी डबा घेऊन गेले होते. परंतु सकाळ होऊनही ते घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र  अखेर त्यांचा मृतदेह सकाळी सडे हद्दीत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ आढळून आला. या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

त्यांचा अपघातात मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. या घटनेने उंबरे परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Rahuri Accident finding the doctor’s body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here