Home क्राईम मित्राच्या पत्नीसोबतचे अश्लील फोटो सोशियल मेडीयावर पाठवून बदनामी व धमकी

मित्राच्या पत्नीसोबतचे अश्लील फोटो सोशियल मेडीयावर पाठवून बदनामी व धमकी

Crime Defamation and intimidation by posting obscene photos of a friend

पुणे | Crime : मित्राच्या पत्नीसोबतचे अश्लील फोटो एडिट करून सोशियल मेडीयावर (WhatsApp) वर पाठवत बदनामी केली तसेच पैसे दिले नाही तर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी) अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 जानेवारी ते 24 जानेवारी 2022 या कालावधीत घडला.

याप्रकरणी एका 39 वर्षीय व्यक्तीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीच्या मोबाईलवरती आरोपीने अनेक वेळा फोन करत 3 व 5 हजारांची मागणी करण्यात आली मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपीने फिर्यादी आणि त्याच्या मित्राच्या पत्नीचे अश्लील फोटो एडिट केला. आणि फिर्यादीच्या ओळखीच्या 15 जणांना हा एडिट केलेला फोटो WhatsApp  वरती पाठवून त्याची बदनामी केलीच शिवाय आणखी पैसे दिले नाही तर फोटो आणखी व्हायरल करण्याची धमकीही आरोपीने दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी खंडणी IT Act अन्वये याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime Defamation and intimidation by posting obscene photos of a friend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here