Theft: संगमनेर शहरात दुकान फोडले, ऐवज लंपास
Sangamner Theft | संगमनेर: संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरातील कासट संकुल येथील अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील सुमारे 67 हजार रुपयांच्या फुड सप्लीमेंटचे सामान चोरल्याची घटना शनिवारी रात्री रात्री घडली.
याबाबत आदित्य किशोर गुप्ता यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अकोले नाका परिसरातील कासट संकुल येथील दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने या दुकानातील वस्तुंची चोरी केली. या चोरट्याने दुकानातील 45 हजार 800 रुपयांचे मास गेनर, 12 हजार रुपयांचे गेनर, 24 हजार मसल गेनर असा सुमारे 67 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे हे करत आहेत.
Web Title: Shop theft in Sangamner town