Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याचा १२ वीचा तालुकानिहाय निकाल, जिल्ह्यात हा तालुका सर्वाधिक

अहमदनगर जिल्ह्याचा १२ वीचा तालुकानिहाय निकाल, जिल्ह्यात हा तालुका सर्वाधिक

Ahmednagar Talukawise HSC Result 2022

अहमदनगर | Ahmednagar Talukawise HSC Result 2022: राज्याचा बारावीचा निकाल बुधवारी दुपारी ऑनलाईन जाहीर झाला आहे. जिल्ह्याचा निकाल ९४०४१ टक्के इतका लागला आहे. यामध्ये मुलींनीच मुसंडी मारली आहे. पुणे विभागात नगर जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्यात शेवगाव तालुक्याचा ९८.५७ टक्के सर्वाधिक निकाल राहिला आहे. 

तालुकानिहाय निकाल:

संगमनेर (94.03),  शेवगाव (98.57),  श्रीगोंदा (92.33),  श्रीरामपूर (86.76), अकोले (93.87), जामखेड (97.51),  कर्जत (95.67),  कोपरगाव (89.03),  नगर (96.92), नेवासा (95.51),  पारनेर (97.88),  पाथर्डी (95.55),  राहाता (93.83),  राहुरी (90.24),

जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल 98.79 टक्के लागला आहे. यामध्ये मुलांचे प्रमाण हे 98.60 तर मुलींचे प्रमाण 99.04 टक्के आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 93.44 टक्के लागला असून यामध्ये मुलांचे प्रमाण 91.35 तर मुलींचे प्रमाण 95.83 टक्के आहे. कला शाखेचा निकाल 86.97 टक्के असून यामध्ये मुलांचे प्रमाण 83.99 तर मुलींचे प्रमाण 91.91 टक्के आहे.

जिल्ह्यातून विज्ञान शाखेमधील 35 हजार 600 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यापैकी 35 हजार 171 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेमधील 17 हजार 794 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यापैकी 15 हजार 477 विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी वाणिज्य शाखेमधील 8 हजार 496 विद्यार्थी परिक्षेला हजर होते. त्यातील 7 हजार 939 विद्यार्थी पास झाले आहेत.

Web Title: Ahmednagar Talukawise HSC Result 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here