Home Accident News टेम्पो दुचाकीत अपघात, युवतीचा मृत्यू : Ahmednagar Accident

टेम्पो दुचाकीत अपघात, युवतीचा मृत्यू : Ahmednagar Accident

Tempo bike accident, death of a young woman

अहमदनगर | Ahmednagar: टेम्पोने दुचाकीला धक्का दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) दुचाकीवरील युवतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात अहमदनगर पुणे रोड वरील इम्पेरीयल चौकात झाला. या अपघातात स्वरांजली शिवाजी शिंदे वय १६ रा. केडगाव या युवतीचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वरांजलीचे वडिल शिवाजी शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे.  स्वरांजली ही तिच्या काकाची दुचाकी घेऊन अहमदनगर-पुणे रोडवरून केडगावच्या दिशेने जात असताना इम्पेरियल चौकात तिच्या दुचाकीला टेम्पोने धक्का दिला. जखमी स्वरांजलीला शहरातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Tempo bike accident, death of a young woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here