Home महाराष्ट्र ब्रेकिंग: राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी तिघांना उमेदवारी जाहीर

ब्रेकिंग: राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी तिघांना उमेदवारी जाहीर

NCP Legislative Council Election candidate Latest News

मुंबई : राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीवरून हलाचाली घडत असताना आता  दुसरीकडे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासोबत रामराजे निंबाळकर यांना सुद्धा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून तिसरा उमेदवार जाहीर झाला आहे.  शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाजीराव गर्जे हे राष्ट्रावादी कार्यालयातील कामकाज बरयाच वर्षांपासून पाहत आहे.

 राज्यात येत्या 20 जून रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे. याकरिता आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारांची यादी जाहीर केली असून, एकनाथ खडसे आणि राम राजे निंबाळकर, शिवाजीराव गर्जे यांना संधी देण्यात आली आहे. आज एकनाथ खडसे, शिवाजीराव गर्जे आणि रामराजे निंबाळकर राष्ट्रवादीकडून अर्ज भरतील.

Web Title: NCP Legislative Council Election candidate Latest News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here