Home अहमदनगर अहमदनगर: पेट्रोल पंपावर टँकरला आग- Fire

अहमदनगर: पेट्रोल पंपावर टँकरला आग- Fire

Ahmednagar Tanker fire at petrol pump

Ahmednagar | अहमदनगर: विळद घाट येथील एका पेट्रोल पंपावर उभ्या असलेला टँकरने अचानक पेट (Fire) घेतल्याने चांगलीच धांदळ उडाली. सोमवारी दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. टँकर शेजारी असलेल्या झाडाझुडपांना लागलेल्या आगीमुळे टँकरने पेट घेतल्याचे माहिती समोर येत आहे. एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

टँकर अचानक पेटल्याने पंपावरील कामगार व वाहनात पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. एमआयडीसीच्या अग्निशमन विभागाला याची तात्काळ माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या आगीत टँकर जवळपास पूर्णपणे जळून खाक झाला.

टँकरशेजारी असलेल्या गवत व झाडाझुडुपांमध्ये आग लागली व त्यामुळे टँकरने पेट घेतला, असे सांगितले जात आहे. सदरचा टँकर तेथे पार्क करण्यात आलेला होता. एमआयडीसी पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अधिक चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Ahmednagar Tanker fire at petrol pump

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here