Home महाराष्ट्र धक्कादायक! मुळा नदीपात्रात कोसळली बस, बसमध्ये प्रवासी…

धक्कादायक! मुळा नदीपात्रात कोसळली बस, बसमध्ये प्रवासी…

Accident bus fell into the river basin

वाकड: मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील मुळा नदीपात्रावरील उड्डाणपुलाच्या कठड्याला खासगी बसनं धडक (Accident) देऊन तो कठडा तोडून बस मुळा नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. बसचालकानं प्रसंगावधान राखत बसमधून उडी मारल्याने तो बचावला. बसमध्ये प्रवासी नव्हते म्हणून मोठा अनर्थ टळला.

मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून खासगी बस साताऱ्याच्या दिशेने जात असतानाच हा अपघात घडला. सोमवारी पहाटे पाच पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर वाकडजवळ मुळा नदीवरील उड्डाणपुलावर बस आली. त्याचवेळी चालकाचा ताबा सुटला. अनियंत्रित झालेली बस पुलाच्या कठड्याला धडकली. धडक इतकी जोरात होती की, बस मुळा नदीपात्रात जाऊन कोसळली. सुदैवानं या बसमध्ये प्रवासी नव्हते. चालकानं प्रसंगावधान राखत धावत्या बसमधून उडी मारली. त्यामुळे तो बचावला.

Web Title: Accident bus fell into the river basin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here