तरुण व्यापाऱ्यावर गुंडांच्या जमावाचा हल्ला
अहमदनगर | Ahmednagar: मार्केट यार्ड आवारातील बाजारपेठेत उच्चशिक्षित तरुण व्यापार्यावर 25 ते 30 गुंडांच्या जमावाने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यामध्ये व्यापारी ऋषभ अजय बोरा जखमी झाले आहेत. यावेळी बोरा कुटुंबातील महिलांना देखील गुंडांनी मारहाण करत पोलिसांसमोरच धुडगूस घातल्याचे व्यापारी अजय बोरा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
शुक्रवारी रात्री उशिरा कोतवाली पोलिसांनी बोरा यांची फिर्याद दाखल केली आहे. काँग्रेस कार्यालयामधील पत्रपरिषदेत पत्रपरिषदेत माहिती देताना बोरा म्हणाले, यावेळी बंदूक, धारदार शस्त्राचा धाक दाखवून जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे लिखित अर्ज करून संरक्षण मागण्यात आले होते मात्र ते दिले गेले नाही. वेळीच संरक्षण दिले असते तर बाजारपेठेत गुंडांची धुडगूस घालण्याची हिंमत झाली नसती. बोरा कुटुंबीयांना व व्यापार्यांना पूर्ण संरक्षण देण्याचे काम काँग्रेस करणार असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत सांकाल घटनेची माहिती समजताच काँग्रेसने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्री उशिरा कोतवाली पोलिसांनी बोरा यांच्या फिर्यादीवरून भादवी 143, 147, 148, 149, 323, 324, 504,506, शशस्त्र अधिनियम 3, 25 अन्वये अजित औसारकर, अनील औसारकर, सुजित औसरकर, अगर यांच्यासह अन्य 20 ते 25 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरा यांनी सांगितले की, मार्केट यार्ड बाजारपेठेमध्ये आमची मिळकत क्र. 52 आहे. याबाबत आमचे चुलत भावंडांशी घरगुती स्वरूपाचे मतभेद आहेत. आमच्या चुलत भावाने बेकायदेशीररित्या परस्पर ही जागा औसरकर यांना विकली आहे. ती विक्री बेकायदेशीर आहे. याबाबत दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. औसरकरांनी जागा खाली करून घेण्यासाठी तृतीयपंथीयांना मुखत्यारपत्र करुन दिले आहे. ताबा मिळविण्यासाठी दहशत करून षडयंत्र रचले जात आहे.
Web Title: Ahmednagar young trader is attacked by a mob