Home Accident News कारचा टायर फुटल्याने एकाच कुटुंबातील तिघे ठार, एक जखमी

कारचा टायर फुटल्याने एकाच कुटुंबातील तिघे ठार, एक जखमी

Nagpur Accident same family were killed when a car tire burst

नागपूर | Nagpur: भरधाव वेगात असणाऱ्या कारचा अचानक टायर फुटल्याने झालेल्या अपघातात (Accident) पती, पत्नी व मुलगा जागीच ठार झाले तर कारचालक महिला गंभीर जखमी झाली आहे. अमरावती कोंढाळी मार्गावर निर्मल सुत गिरणीजवळ शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

अनुपम विनोदकुमार गुप्ता वय ५०, पत्नी रेणू अनुपम गुप्ता वय ४५, मुलगा अक्षद अनुपम गुपाता वय २७ सर्व रा. जबलपूर मध्यप्रदेश अशी मयतांची नावे आहेत. कारचालक अनुपम गुप्ताची बहिण अर्चना संदीप अग्रवाल वय ५७ जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

सदर कार हि अकोला येथून नागपूर मार्गे जबलपूर कडे जात होती.  अमरावती कोंढाळी मार्गावर निर्मल सुत गिरणीजवळ जात असताना अचानक टायर फुटल्याने कारचालक यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रोड दुभाजकावरून उसळून तीन पलटी खात उभी हाली. अपघात इतका भीषण होता कि, कारचा चुराडा झाला असून तिघा मृतकांचे डोके चेंदामेंदा होत मेंदू बाहेर पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Nagpur Accident same family were killed when a car tire burst

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here