हाय प्रोफाइल महिलांसोबत सेक्सचं दाखवलं स्वप्न, व्यावसायिकासोबत घडलं असं
पुणे | Pune Crime: मागील काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ होत आहे. आमिष दाखवून सामान्य नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत गंडा घालण्याचे काम होत आहे. (sex with high profile women)त्यांची आर्थिक फसवणूक करत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील एका किराणा व्यावसायिकासोबत घडला आहे. हाय प्रोफाइल महिलांसोबत शरीरसंबंध ठेवण्याचं स्वप्न दाखवत एका महिलेनं त्यांना तब्बल 60 लाखांना गंडा घातल्याची घटना घडली आहे.
पीडित व्यावसायिकानं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी व्यावसायिकाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी वानवडी येथील एका महिलेसह तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 28 वर्षीय महिलेला वानवडी परिसरातून अटक केली आहे. तर तिच्या एका पुरुष साथीदाराचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: dream of having sex with high profile women, as if it happened with a professional