Home अहमदनगर तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar Young woman commits suicide by hanging herself

अहमदनगर: नगर शहरातील २४ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.

अंकिता धर्मा करांडे असे या आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. अहमदनगर शहरातील सारसनगर भागात अंकिता ही कुटुंबांसोबत राहत होती. अंकिता ही अनभुले या महाविद्यालयात बीएचएएस च्या चौथ्या वर्षात शिकत होती. तिची सध्या परीक्षा सुरु आहे. अंकिताला पेपर अवघड गेल्याने तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मंगळवारी सकाळी अंकिता ही घरातून बाहेर आली व परत रूममध्ये गेली. बराच वेळ अंकिता बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबियांनी बघितले असता अंकिताने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याचे उघडकीस आले. या घटनेची माहिती समजताच भिंगार कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Ahmednagar Young woman commits suicide by hanging herself

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here