Home अकोले माजी मंत्री व भाजपाचे नेते दिलीप गांधी यांचे निधन

माजी मंत्री व भाजपाचे नेते दिलीप गांधी यांचे निधन

Former minister and BJP leader Dilip Gandhi passes away

अहमदनगर: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते दिलीप गांधी यांचे आज पहाटे निधन झाले आहे. दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षाचे होते. त्यांची मंगळवारी करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती.

त्यांच्यावार दिल्ली रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतच अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.

नगर दक्षिण मतदार संघात त्यांनी तीन वेळा खासदार बनून प्रतिनिधित्व केले होते. काही दिवसांपासून ते दिल्लीतच होते. मात्र आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना या निधनाने अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ते सुरुवातीपासूनच भाजपाच्या कामाला सुरुवात केली होती. त्यांनी १९९९ मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. त्यांनतर २००९ व २०१४ मध्ये ते लोकसभेत निवडून आले होते.

Web Title: Former minister and BJP leader Dilip Gandhi passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here