Home अकोले राजूर पोलिसांची कारवाई:  अवैध गॅस टाक्यांचा साठा सापडला

राजूर पोलिसांची कारवाई:  अवैध गॅस टाक्यांचा साठा सापडला

Rajur Stocks of illegal gas tanks found

राजूर | Rajur: राजूर पोलिसांनी अवैध गॅस टाक्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे.

राजूर येथील लक्ष्मीनारायण मंदिरामागे टाकलेल्या छाप्प्यात तब्बल १६२ घरगुती वापराच्या अवैध गॅस टाक्यांचा साठा जप्त करण्यात आल्या आहेत. या टाक्यांची अंदाजे रक्कम ३ लाख १७ हजार ४५० रुपये आहे.

राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना गुप्त बातमीदवारे राजूर गावात लक्ष्मीनारायण मंदिरामागे अवैध गॅस सिलेंडरचा गैरवापर सुरु असल्याचे समजले. त्यावरून साबळे यांनी पथकासह तेथे राहत असलेल्या गणेश उर्फ राजेंद्र लहामगे याच्या घरावर छापा टाकला. त्याठिकाणी घराच्या खोलीत व गोठ्यात १६२ घरगुती वापराचे सिलेंडर जप्त करण्यात आले. तसेच गॅससिलेंडरमधून वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारी मशीन व सामग्री त्याठिकाणी मिळून आली.

याप्रकरणी लहामगे याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला पोलीस नाईक व्ही. के. मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार, सहायक फौजदार प्रकाश निमसे, कॉन्स्टेबल काळे, थोरात, मोरे, पटेकर यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Rajur Stocks of illegal gas tanks found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here