Home अहमदनगर धक्कादायक: अहमदनगरला जाणाऱ्या 22 पैकी 19 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

धक्कादायक: अहमदनगरला जाणाऱ्या 22 पैकी 19 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

Ahmedngar News Today Corona Update information

बीड (वडवणी) | Ahmednagar News Today: बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातून अहमदनगर  येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या 22 रुग्णांपैकी तब्बल 19 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एकाच वेळी इतके रुग्ण कसे बाधित झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.  विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण वडवणी तालुक्यातील असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.

वडवणी येथून अनेक जण अहमदनगर येथे डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी जात असतात. गुरुवारी 22 रुग्ण अशाच शस्त्रक्रियेसाठी निघाले होते. वाटेत एका आरोग्य केंद्रात या सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामधील 19 जण कोरोना  पॉझिटिव्ह आले. हे अहवाल आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसला. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकदाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांनी ही माहिती तत्काळ तालुका स्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. या सर्वांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. यामुळे वडवणीत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

Web Title: Ahmedngar News Today Corona Update information

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here