Home अहमदनगर अहमदनगरमध्ये दरोडा: सहा जणांचा हैदोस, तिघांना कुऱ्हाडीने बेदम मारहाण

अहमदनगरमध्ये दरोडा: सहा जणांचा हैदोस, तिघांना कुऱ्हाडीने बेदम मारहाण

Theft Robbery in Ahmednagar Hidos of six persons, three beaten to death with ax

अहमदनगर | Ahmednagar Theft : अहमदनगरमधील पाथर्डी शहर हद्दीतील चितळे वस्तीवर सहा जणांनी दरोडा टाकत (Robbery) दरोडेखोरांनी तीन वयोवृद्ध नागरिकांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोन्याचे दागिने,20 हजार रुपयांची रोख रक्कम आरोपींनी (Theft)लंपास केली आहे. या घटनेने पाथर्डीत खळबळ उडाली आहे.

लिंबाजी नाथ चितळे (वय 65 वर्ष), बाबुराव गुणाजी उळगे (वय 65 वर्ष) आणि कमलबाई लिंबाजी चितळे (वय 58 वर्ष) असे  मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तींची नावे आहेत. दरोडेखोरांनी त्यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. या मारहाणीत लिंबाजी नाथ चितळे हे गंभीर जखमी झाले असून अत्यवस्थ असल्याची माहिती आहे. जखमींच्या डोक्याला जबर मार लागला असून हात फ्रॅक्चर झाले आहेत.

शुक्रवारी मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास शेवगाव रोडवरील प्रेमश्री पेट्रोल पंपासमोर राहणाऱ्या लिंबाजी चितळे यांच्या घरावर सहा दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी आधी बाहेर झोपलेल्या कमलबाई चितळे यांना जबर मारहाण केली. त्यानंतर घराचा दरवाजा तोडून घरात झोपलेल्या लिंबाजी चितळे, बाबुराव गुणाजी उळगे, लक्ष्मीबाई उळगे यांच्यापैकी लिंबाजी आणि बाबुराव यांना जबर मारहाण केली.

लक्ष्मीबाई उळगे (वय 60 वर्ष) यांच्याकडील गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, कानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांना काढून घेतले. त्यांना मात्र दरोडेखोरांनी मारहाण केली नाही. या प्रकरणी पाथर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Theft Robbery in Ahmednagar Hidos of six persons, three beaten to death with ax

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here