Home अकोले अकोलेतील १२ वर्षीय मुलगा तीस ते चाळीस फुट दरीत कोसळून गंभीर जखमी

अकोलेतील १२ वर्षीय मुलगा तीस ते चाळीस फुट दरीत कोसळून गंभीर जखमी

Akole 12-year-old boy fell into a 30- to 40-foot ravine and was seriously injured

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी गावात असलेल्या घोरपडवाडी शिवारात कड्यावरून पाय घसरून सुमारे ३० ते ४० फुट खोल दरीत कोसळून १२ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली आहे. किसन लक्ष्मण गावंडे असे या जखमी मुलाचे नाव आहे.

घोरपडवाडी येथील शिवनदी परिसरात येथील किसन आणि त्याचे आणखी दोघे मित्र फिरण्यासाठी गेले होते. कड्याच्या अरुंद पायवाटेने जात असताना त्यांना अचानक साप दिसल्याने ते घाबरले. यावेळी घाईघाईने मागे फिरले मागे फिरत असतानाचा अरुंद पायवाटेने कड्यावरून घसरून किसन हा ३० ते ४० फुट खोल दरीत कोसळला. त्यासोबत असलेल्या दोघांनी मोबाईलवर घरच्यांशी संपर्क केला.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

यावेळी गावातील रामनाथ पथवे आणि किसनचे वडील लक्ष्मण गावंडे यांनी कड्याकडे धाव घेतली त्यावेळी किसन हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यास अकोले ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्या डाव्या कानातून रक्त येत असल्याने उपचार करण्यात आले. मात्र तो बेशुद्धावस्थेत असल्याने त्यास नाशिक येथे नेण्यात आले आहे. याप्रसंगी ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

Web Title: Akole 12-year-old boy fell into a 30- to 40-foot ravine and was seriously injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here