Home अकोले अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांची बदली

अकोलेचे तहसीलदार मुकेश कांबळे यांची बदली

Transfer of Akole Tehsildar Mukesh Kamble

अकोले | Akole: तहसीलदार मुकेश कांबळे यांची धुळे येथे जिल्हा सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली आहे. अद्याप तालुक्यात नवीन तहसीलदार नियुक्त झालेले नाही. नायब तहसीलदार ठकाजी महाले यांच्याकडे त्यांनी मंगळवारी पदभार सुपूर्द केला.

नवीन तहसीलदार नियुक्त होईपर्यंत महाले हेच प्रभारी तहसीलदार म्हणून काम करणार आहेत. तहसीलदार मुकेश कांबळे हे चार वर्षापासून अकोलेत तहसीलदार होते. बुधवारी ते सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून ते रुजू झाले आहेत.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

मुकेश कांबळे यांनी आव्ह्नात्मक कामे केली आहे. त्यांच्याबाबत विविध संघटनाकडून सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या कार्याचा ठसा जनमानसावर उमटविला आहे. त्यांनी नियोजनबद्ध कामगिरी करत जनतेला न्याय मिळवून दिला. चार वर्षातील निवडणुका नियोजन त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. अवैध वाळू उपशावर त्यांनी कारवाई केली.  

Web Title: Transfer of Akole Tehsildar Mukesh Kamble

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here