Home अकोले अकोलेत अवैध दारूविक्रीप्रकरणी पाच जणांना अटक, मुद्देमाल हस्तगत

अकोलेत अवैध दारूविक्रीप्रकरणी पाच जणांना अटक, मुद्देमाल हस्तगत

Akole Five arrested in Akole for selling illegal liquor

अकोले | Akole: अकोले पोलिसांनी दोन ठिकाणी छापा मारून अवैध दारू विक्रीसाठी वाहतूक करताना १ लाख ५४ हजार ९६० रुपयांचा मुद्देमालासह पाच जणांना अटक वकेली आहे.

प्रथम: सुगाव ते लिंगदेव जाणारे रोडवर वाशेरे फाटा येथे मंगेश कोंडाजी ढोकरे वय ६ रा. शाहूनगर अकोले व दत्तात्रय दिनकर नाईकवाडी रा. अकोले हे २ ऑगस्ट रोजी रात्री २ वाजता ८० बॉबी संत्रा देशी दारूच्या सीलबंद बाटल्या सायकलवर अवैध चोरून विक्रीसाठी वाहतूक करत असताना मिळून आल्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

दुसरा: ३ ऑगस्ट रोजी अकोले ते वाघापूर अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून सद्दाम सलीम मणियार रा. कमानवेस अकोले, रंगनाथ शांताराम पवार, सुनील बबन लांडे रा. वाघापूर यांना १ लाख ० हजार १६० रुपयांची अवैध दारू वाहतूक करताना एका चार चाकी वाहनासह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Akole Five arrested in Akole for selling illegal liquor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here