Home क्रीडा चक दे इंडिया, ऐतिहासिक विजय, भारताचा जर्मनीवर रोमहर्षक विजय

चक दे इंडिया, ऐतिहासिक विजय, भारताचा जर्मनीवर रोमहर्षक विजय

India wins medal in Hockey after 41 years

टोकियो: भारतीय संघाने आज इतिहास रचला आहे, कांस्य पदकासाठी झालेल्या  भारत जर्मनी लढतीत भारताने ५-४ असा विजय मिळविला आहे. भारतीय हॉकी संघाने तब्बल ४१ वर्षानंतर ऑलिंपिक पदक जिंकले आहे. भारताने ५-४ असा विजय मिळवत कास्यपदकावर कब्जा केला आहे.

आज झालेल्या लढतीत सिमरनजीत सिंगने दोन आणि हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या ऐतहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला आहे,

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत जर्मनीने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पण भारत आत्मविश्वासने खेळत होता. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीला -1-0 ने आघाडी मिळाली. म्हणजेच पहिल्या क्वार्टरवर जर्मनीचं वर्चस्व राहिलं.

दुसऱ्या क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच भारताच्या सिमरनजीतने एक गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. पण नंतर पुन्हा जर्मनीने दोन करत भारताला बॅकफूटला ढकललं. पण जर्मनीच्या दोन गोलनंतरही भारतीय संघ मागे हटला नाही.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

भारताने जिद्द न सोडता आपला खेळ दिमाखात सुरु ठेवला. प्रत्येक भारतीय खेळाडूच्या मनात आज आत्मविश्वास ठासून भरला होता. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घ्यायचा हे भारतीय संघाने ठरवलं होतं. त्यानुसार हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी कमी केली. तसंच हरमनप्रीतने पुन्हा गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. म्हणजेच तिसऱ्या क्वार्टरमध्ये एकूण 5 गोल झाले.

Web Title: India wins medal in Hockey after 41 years

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here