Home अकोले अकोले:  ऋषिकेश वालझाडे यांना आदर्श शिक्षक तर रमाकांत गायकवाड तसेच सुधिर रूपवते...

अकोले:  ऋषिकेश वालझाडे यांना आदर्श शिक्षक तर रमाकांत गायकवाड तसेच सुधिर रूपवते यांना कलाभुषण.

ऋषिकेश वालझाडे यांना आदर्श शिक्षक तर रमाकांत गायकवाड तसेच सुधिर रूपवते यांना कलाभुषण.

अकोले:  -संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकाचे योगदान विशेष उल्लेखनीय असते. हाच आदर्श समाजापुढे ठेऊन मातंग समाज सद्भावना मित्रमंडळ लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिनव शिक्षण संस्थेचे शिक्षक ऋषिकेश संजय वालझाडे यांना आदर्श शिक्षक तर रमाकांत गायकवाड व सुधिर रूपवते यांना कलाभुषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सदर पुरस्काराचे वितरण संस्थेचे अध्यक्ष दशरथ मानवकर, आमदार भाऊसाहेब पाटील, प्रवक्ता तथा महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे माजी सदस्य सुरजितसिंग खुंगार, महाराष्ट्र कबड्डी आसोसिएसनचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
याबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, उपाध्यक्ष सुरेशराव कोते, कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी, प्राचार्या जयश्री देशमुख, प्राचार्या अल्फोन्सा मॅडम, श्रीवास्तव मॅडम,प्रा.लक्ष्मणकांत आहेर,प्रा. किरण गोंटे, अनिल बेंद्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद अभिनव परिवार अकोले यांनी अभिनंदन केले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


websites


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here