Home महाराष्ट्र जळगावात अग्नितांडव

जळगावात अग्नितांडव

जळगावात अग्नितांडव

जळगाव : –  शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पंचशील नगर व फुकटपुरा झोपडपट्टी परिसरात शॉर्टसर्किटमुळे पार्टीशनाच्या घरांना आग लागली. या भीषण आगीत सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी तब्बल २० घरांची राखरांगोळी झाली. आगीमुळे नागरिक भयभीत होवुन जीवाच्या आकांताने पळत होते. दरम्यान अग्निशमनच्या चार बंबामुळे आग आटोक्यात आली. आगीची घटना सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली..

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

शहरातील पंचशील नगर व फुकटपुरा झोपडपट्टी परिसर संमिश्र वस्तीचा भाग आहे. या परिसरातील गौतम सोनु सुरवाडे हे पत्नी उज्वलबाई सुरवाडे यांच्यासह आपल्या मुलांसोबत वास्तव्यास आहे. आज सायंकाळी उज्वलाबाई सुरवाडे या घराबाहेर अंगणात असल्याचे शेजारी राहणाऱ्या महिलाने उज्वलाबाई यांना सांगितले.

दरम्यान घरात कोणीच नसुन मुल देखील बाहेर खेळत असुन घरातुन कसाकाय धुर निघत आहे. हे बघण्यासाठी उज्वलाबाई या घरात गेल्या असता. त्यंच्या घराच्या मागच्या बाजुला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजुन पार्टीशनच्या घराने आतुन पेट घेतला होता.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here