Home संगमनेर संगमनेर मध्ये सोन्याचे दुकान फोडण्याचा चोरटयांचा प्रयत्न

संगमनेर मध्ये सोन्याचे दुकान फोडण्याचा चोरटयांचा प्रयत्न

संगमनेर मध्ये सोन्याचे दुकान फोडण्याचा चोरटयांचा प्रयत्न

संगमनेर : – संगमनेर शहरात गेल्या काही दिवसांपासुन चोरटयांनी प्रचंड धुमाकुळ घातला आहे. वाहन चोरी , घरफोडी असे प्रकार सातत्याने होत आहेत. आज बुधवारी पहाटेही शहरातील घासबाजार येथे  असणारे श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स फोडण्याचा अज्ञात  चोरटयांनी प्रयत्न केला.

You May Also LikeSuhana Khan age, Birthdate, Biography, height

शहरातील घासबाजार येथे अनिता बागडे यांचे श्री स्वामी समर्थ ज्वेलर्स नावाने सोन्या चांदीचे दुकान आहे. दरम्यान आज पहाटे चार साडेचारच्या सुमारास अज्ञात पाच ते सहा चोरटयांनी या दुकानाचे शटरचे दोन्ही बाजुचे कुलुप तोडुन आत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र या शटरचे सेंटर कुलुप मजबुत असल्याने चोरटयांना ते तोडता आले नाही. त्यामुळे या चोरटयांचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरी करणाऱ्या चोरटयांचे चेहेरे रूमालाने बांधले होते व ते पाच ते सहा जण होते. असे काही प्रत्यक्ष दर्शीनीनी सांगितले.   चोरटयांनी आणखी काही ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला असल्याचे समजते. शहर पोलिस निरीक्षक अभय परमार यांनी घटनेची माहिती घेत घटनास्थळी भेट दिली. व पाच चोरटयांचा शोध सुरु केला. शहर व परिसरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनामुळे व्यापारामध्ये  भितीचे वातावरण पसरले असुन पोलीस व प्रशासनाने या चोरटयांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापारी वर्गाकडुन  केली जात आहे.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here