Home अकोले अकोले: कर्जबाजारीपणामुळे जामगावात तरुणाची आत्महत्या

अकोले: कर्जबाजारीपणामुळे जामगावात तरुणाची आत्महत्या

अकोले: अकोले तालुक्यातील जामगाव येथील वाल्मिक शिवाजी आरोटे वय 36 या तरुणाने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना काल मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी राजूर पोलिस ठाण्यात जामगावचे पोलिस पाटील गीताराम महाले यांनी दिलेल्या फिर्‍यादिवरून पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली.  राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात शववीचेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 वर्षाची मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे. आत्महत्येचे कारण नेमके समजू शकले नाही मात्र मयत वाल्मिक याने आत्महतेपूर्वी लिहिलेली चिठ्ठीत आपण  कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यादृष्टीने सहा. फौजदार निमसे पुढील तपास करीत आहे.

Website Title: Akole jaamgaav young man Suicide 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here