Home अकोले अकोले कर्जत पारनेर नगरपंचायतीसाठी झाले इतके टक्के मतदान

अकोले कर्जत पारनेर नगरपंचायतीसाठी झाले इतके टक्के मतदान

Akole Karjat Parner Nagar Panchayat Election

अहमदनगर | Nagar Panchayat Election: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले कर्जत पारनेर नगरपंचायतीसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.  अकोले नगर पंचायत निवडणुकीसाठी अकोल्यात काल 80.69 टक्के पेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. शहरा पेक्षा शहरा लगतच्या ग्रामीण परिसरात मतदारांत अधिक उत्साह दिसून आला.प्रभाग क्रमांक 8 (शेकईवाडी) मध्ये सर्वाधिक म्हणजे 80 टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वात कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 10 हजार 194 मतदारांपैकी 8 हजार 226 म्हणजे 80.69 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

अकोले प्रभागनिहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे आहे. प्रभाग 1-88.58, प्रभाग- 2,86.33, प्रभाग 3-69.78, प्रभाग 5- 76.52, प्रभाग 6 ,73.66, प्रभाग 7-77.38, प्रभाग 8-88.10, प्रभाग 9-76.52, प्रभाग 10- 91.49, प्रभाग 12- 83.34, प्रभाग 15- 81.21, प्रभाग 16- 83.66, प्रभाग 17 -89.74

कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत एकूण 80.21 टक्के मतदान  झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र सायंकाळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत विजयी जल्लोष साजरा केला.

मंगळवारी पारनेर नगर पंचायतीच्या  13 जागांसाठी शांततेत 86.09 टक्के पेक्षा जास्त मतदान  झाले. 13 प्रभागातील 8992 मतदारापैकी 7742 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

ओबीसी जागांसाठी जानेवारी महिन्यात मतदान होणार असुन त्यानंतर 19 जानेवारी 2021 रोजी सर्व जागाची एकत्रित मतमोजणी होणार आहे. अशी माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली.

Web Title: Akole Karjat Parner Nagar Panchayat Election

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here