Home महाराष्ट्र चिंता वाढली: राज्यात ओमायक्रॉनचे 11 नवे रुग्ण; एकूण रुग्ण 65 वर

चिंता वाढली: राज्यात ओमायक्रॉनचे 11 नवे रुग्ण; एकूण रुग्ण 65 वर

Corona News Update Today 11 Omicron

मुंबई | Corona News Update Today 11 Omicron : संपूर्ण जगात थैमान घालत असणाऱ्या ओमायक्रॉनने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे. आज राज्यात ११ नवीन बाधितांची भर पडली आहे. राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६५ वर पोहोचली आहे.   रुग्ण वाढीचा वेग कमी असला तरीही चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ११ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत. यामध्ये ८ रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीतील तर प्रत्येकी १ रुग्ण पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे आढळून आला आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण ६५ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण अहवाल झाले आहेत.

Web Title: Corona News Update Today 11 Omicron

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here