Home Accident News संगमनेर: वरुडी पठार येथे दुचाकींच्या अपघातात अॅड.शंतनू वैद्य यांचे निधन

संगमनेर: वरुडी पठार येथे दुचाकींच्या अपघातात अॅड.शंतनू वैद्य यांचे निधन

Sangamner Adv. Shantanu Vaidya dies in two-wheeler accident

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील वरुडी फाटा शिवारात दोन दुचाकींच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात (Accident) दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अॅड.शंतनू श्रीधर वैद्य वय ३२ रा. संगमनेर  असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. हा अपघात मंगळवारी ४.४५ वाजेच्या सुमारास घडला.

पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी क्रमांक एम,एच. १७ अ क़ु, ९९४२ ही वरुडी फाट्यावरून वरुडी येथे जाण्यासाठी वळत असताना पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकलवरील चालक यांना धडक बसून नये म्हणून दुचाकी नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात दुचाकी दुभाजकावर जाऊन आदळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती समजताच डोळसणे महामार्ग केंद्राचे डॉ. सुरज ढगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसऱ्या दुचाकीवरील गणपत दत्तू जाधव व अलका गणपत जाधव रा. जोर्वे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी वाहनातून संगमनेर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मयत दुचाकीस्वार यांचा मृतदेह शवविचेदन करण्यासाठी कॉटेज हॉस्पिटल संगमनेर येथे पाठविण्यात आला आहे. या अपघाताच्या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Sangamner Adv. Shantanu Vaidya dies in two-wheeler accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here